भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी मंगळवारी येणाऱ्या सणांपूर्वी राज्य सरकारकडून अजूनही मार्गदर्शक तत्त्वांबाबत स्पष्टता नसल्याने, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू केले आहे. गुढीपाडवा 2 एप्रिलला आहे, तर 10 एप्रिलला रामनवमी साजरी होणार आहे. गुढीपाडवा आणि रामनवमी या दोन्ही सणांच्यावेळी मिरवणुका काढल्या जातात. याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ‘कोविड-19 साथीचा प्रादुर्भाव कमी होत असताना, सण साजरे न करण्यासाठी राज्य सरकार दहशतवादी धोका असल्याचे निमित्त पुढे करत आहे.’
पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘ज्या ज्या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आणि राम भक्तांचा कार्यक्रमा म्हटल्यावर शिवसेनेची बोटचेपी का होते? आमची सरकारला विनंती आहे की, या दोन्ही उत्सवांसाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवानगी देण्यात यावी. भाजप या उत्सवामध्ये पूर्णतः सहभागी होणार.’
रामभक्तांची रामनवमी आली की शिवसेना बोटचेपी भूमिका का घेते?@BJP4Mumbai @BJP4Maharashtra@CMOMaharashtra #RamNavmi pic.twitter.com/1hYCwX5eye
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 29, 2022
देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष "भारतीय जनता पार्टी" च्या स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे ६ एप्रिल ला देशव्यापी कार्यक्रम राबवण्यात येणार तसेच मुंबईतल्या प्रत्येक शक्ति केंद्रावर आम्ही सार्वजनिक कार्यक्रम राबवू.@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @ChDadaPatil @Dev_Fadnavis#BJP pic.twitter.com/Gm6Eai2PU5
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 29, 2022
मुंबई पोलिसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्यावी परंतु यामुळे हिंदू सण साजरे होण्यापासून रोखू नये, असे आशिष शेलार म्हणाले. (हेही वाचा: आतापर्यंत सुडाचे राजकारण फक्त पुस्तकांमध्ये वाचले होते, आता मी ते पाहत आहे, असं म्हणत मंत्री आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका)
ठाकरे सरकार हिंदू सणांच्या विरोधात का आहे?@BJP4Maharashtra @BJP4Mumbai@CMOMaharashtra pic.twitter.com/UolmDnZ95J
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 29, 2022
भाजपाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने मुंबईत सेवा सप्ताह!@BJP4Maharashtra @BJP4Mumbai@Dev_Fadnavis @ChDadaPatil#BJP #Mumbai #SevaSaptah pic.twitter.com/HuGmN51BeT
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 29, 2022
ते पुढे म्हणाले, ‘6 एप्रिल भाजपचा वर्धापन दिवस असतो. पक्षस्थापना दिवसाच्या निमित्ताने, वर्धापन दिनानिमित्त भाजपने एक व्यापक कार्यक्रम ठरवला आहे. भाजप हा जमिनीवर काम करणारा पक्ष आहे. भाजप देशात सर्वात जास्त सेवा करणारा पक्ष आहे. भाजप हा सर्वात जास्त जनसमर्थन मिळालेला महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आहे. म्हणून मुंबईत 6 एप्रिलला शहरातील प्रत्येक शक्ती केंद्रात आम्ही सार्वजनिक कार्यक्रम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मुंबईत दिड हजार ठिकाणी आम्ही कार्यक्रम करणार आहोत. 6 ते 14 एप्रिल हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून पाळला जाणार आहे. यावेळी आम्ही मुंबईतील सर्व नाल्यावर नालेसफाई पाहणीला सुरुवात करणार आहे.'