नालासोपारा: व्हॉट्सअॅपवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला दलालासह चार विवाहीत महिला अटकेत
Whatsapp Sex Racket (Archived, Edited, Representative Images)

मुंबईतील अजून एका सेक्स रॅकेटचा (Sex Racket) फर्दाफाश झाला आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील नालासोपारा (Nalasopara) येथे दीर्घ काळापासून व्हॉट्सअॅपच्या (Whatsapp) माध्यमातून सेक्स रॅकेट सुरु होते. यात महिला दलाल व्हॉट्सअॅपवर ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवत असतं. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरच महिलांवर बोली लावून त्यांची किंमत ठरवली जात होती. इतकंच नाही तर जागाही ठरवण्याचे कामही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच होत होते.

या प्रकरणाची खबर मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला. यात चार विवाहीत महिलांसह एक महिला दलाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. "व्हॉट्सअॅपवर सेक्स रॅकेट सुरु असल्याची खबर आम्हाला मिळताच आम्ही महिला पोलिसांसह त्या ठिकाणी छापा घालण्याचे आदेश दिले," असे एसपी गौरव सिंग यांनी सांगितले. छापा मारण्यापूर्वी पोलिसांनी व्हॉट्सअॅपद्वारे महिला दलालाला बनावट ग्राहक म्हणून संपर्क केला आणि ही टीम पोलिसांच्या जाळ्यात फसली. (ठाण्यातील सेक्स रॅकेट उघडकीस, पोलिसांनी ठोकल्या सहा जणांना बेड्या)

पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून संपर्क केल्यानंतर दलाल असलेल्या महिलेने चार महिलांचे फोटो पाठवले आणि ती महिला ग्राहकाकडे म्हणजे थेट पोलिसांकडे पोहचली. त्याचवेळेस छापा मारुन पोलिसांनी संतोष भवन लॉन्ज मधून संबंधित महिलेला अटक केली. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या सेक्स रॅकेटचा खोलवर तपास करत आहेत.