ठाण्यातील सेक्स रॅकेट उघडकीस, पोलिसांनी ठोकल्या सहा जणांना बेड्या

ठाण्यामध्ये हॉटेल आणि लॉजचे नाव लावून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ठाण्यातील सेक्स रॅकेट उघडकीस, पोलिसांनी ठोकल्या सहा जणांना बेड्या
Sex Racket Busted. (Photo Credit: PTI)

ठाण्यामध्ये हॉटेल आणि लॉजचे नाव लावून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या सुरक्षा विभागाच्या पथकाने बांग्लदेशीमुलींसह इतर 16 तरुणींची सुटका केली आहे.

कापूर बावडी येथील स्वागत लॉज येथे हॉटेल आणि लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालविले जायचे. या कारवाईमध्ये पोलिसांनी बार व्यवस्थापक दिवाकर सुवर्णा आणि देवा जान यांच्यासह अन्य सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या हॉटेल आणि लॉजमध्ये दोन हजार रुपये देऊन मुली पुरविल्या जात असल्याचा प्रकार सुरु होता. या बाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती.(हेही वाचा-अहमदनर येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार जणांना पोलिसांकडून अटक)

या प्रकरणी एका बनावट ग्राहकाची भूमिका साकारुन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. तसेच रेक्स रॅकेटमध्ये सात बांग्लादेशी असून अन्य 16 तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2019 08:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).