शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त शनिवारी (23 जानेवारी) त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला गेलेल्या केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत हात मिळवणी करून राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आहे. पण, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती आणि भीम शक्ती एकत्र असण्याचे स्वप्न अपूर्ण ठेवले आहे, असे आठवले म्हणाले आहेत.
मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास मंत्री आदित्य ठाकरे, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, छनग भुजबळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासंह राज्यातली सर्वच पक्षाचे प्रमुख नेते व महाविकासआघाडीतील मंत्र्यांसह शिवसैनिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला गेलेल्या रामदस आठवले म्हणाले आहे की, काल मी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास गेलो होतो. तेव्हा पुतळा पाहून एकच वाटले की, बाळासाहेब दोन्ही हातवर करून एकच म्हणत असतील, उद्धवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा तुझा निर्णय चुकला, असे रामदस आटवले म्हणाले आहेत. हे देखील वाचा- MNS: प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. हा पुतळा 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.