Raju Patil (Photo Credits: Twitter)

नुकतीच भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil)  यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेटली आहे. राजू पाटील यांनी गडकरी यांच्याशी केलेले भेट राजकीय नसून केवळ विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरीसाठी राजू पाटील यांनी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली आहे. मात्र, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. मात्र, त्यासाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. राज्यात शिवसेनेने साथ सोडल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तुळातील मानले जाणारे आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शक्य ते सर्व करु, असे शिवसेनेला इशारा देणारे विधान केले होते. हे देखील वाचा-कल्याण जवळील पत्री पूलाचे काम पूर्ण; 25 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

दरम्यान, प्रसाद लाड यांनी जवळपास पाऊणतास राज ठाकरे यांच्याशी कृष्णकुंजवर चर्चा केली होती. दरम्यान, प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, ज्यावेळी प्रसाद लाड हे कृष्णकुंजवर आले होते, तेव्हा त्यांचे स्वागत दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केले होते. यामुळे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र लढणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. महत्वाचे म्हणजे, प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कोणता निरोप घेऊन राज ठाकरेंची भेट घेतली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.