Maharashtra Rain Alert: कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज
Photo Credit ; X

आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या पावसाचा अंदाज!)

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, ठाणे पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.