Mumbai Weather Prediction,26 June: मुंबईत आज 25 जून 2024 रोजी तापमान 29.19 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 28.14 °C आणि 29.81 °C दर्शवतो. पण त्याच्या नंतर आता दोन दिवस मात्र पावसाने हजेरी लावली नाही आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, मंगळवारी म्हणजे आज मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व सामान्यतः ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे.भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण आतील कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.येणाऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे असे हवामान खात्याने सांगितलेले पण अध्याप ही पावसाच्या जोरात आपल्याला वाढ मात्र पाहायला नाही मिळत आहे आणि ह्यामुळे दुपारच्या वेळेस उष्णता जाणवत आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांच्या बळकटीकरणामुळे, पुढील पाच दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाच्या हालचालींमध्ये वाढ अपेक्षित आहे, दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवस ठाणे आणि मुंबईच्या परिसरात यल्लो अलर्टचा इशारा दिला आहे. याशिवाय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी परिसरात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दोन्ही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (64.65 ते 115..55 मिमी) अपेक्षित आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान विभागाने उद्याचे हवामान अंदाज लावला आहे: Maharashtra Heavy Rain Alert: कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; एनडीआरएफची टीम तैनात
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
याशिवाय, प्रादेशिक अंदाज विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा परिसरात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.नाशिक, जळगाव, अमरावती, भंडारा आदी भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.