Maharashtra Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज आणि उद्या विजांच्या कडाकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार झाला आहे. पेरणी केलेली शेती बहरली आहे. कोरडे पडलेल्या नदी-नाल्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. रायगड, रत्नागिरीसह कोकणात पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा - Mumbai Rains Update: मुंबईत दमदार पाऊस, विरार येथे झाड कोसळून 70 वर्षीय महिला ठार; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह)

पाहा पोस्ट -

मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर पोहोचले असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. खेड शहरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरुन वाहत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली भागात कालपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाले आहे.