Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा CBI चा तपास कुठपर्यंत आला हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत- गृहमंत्री अनिल देशमुख
Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) सुरु असलेला तपास लोकांच्या CBI चौकशीच्या मागणीवरुन कोर्टाने CBI कडे सुपूर्त केला. त्यानंतर मागील महिना हा CBI तपास सुरु असून या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) कडून बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण (Bollywood Drugs Case) समोर आले. त्या मुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला एक वेगळच वळण लागले आहे. या सर्वांवर नजर ठेवून असलेले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 'CBI या प्रकरणाचा तपास जवळपास दीड महिन्यापासून करत आहे. त्यामुळे त्यांचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे हे जाणून घेण्यास आम्ही फार उत्सुक आहोत' असे ANI शी बोलताना सांगितले.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेस आत्महत्या घोषित करण्यात आले होते. मात्र त्याच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमधून ही आत्महत्या नसून हत्या असल्याची चर्चा होऊ लागली. त्यात त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन बरेच दिवस उलटूनही मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा छडा लागत नसल्यामुळे मुंबई पोलिस सत्य लपवू पाहत आहे असे नाराजीचे सूर लोकांमधून येऊ लागले. त्यामुळे हा तपास CBI कडे द्यावा मागणी होऊ लागली. त्यानुसार हा तपास CBI कडे देण्यात आलाही मात्र आता दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे हा तपास कुठपर्यंत आला आहे हे जाणून घेण्यास आपण फार उत्सुक असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. Bollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण देखील समोर आले आहे. यात अनेक मोठ्या कलाकारांची नावे असल्याचे समोर झाले. यात आतापर्यंत अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची NCB कडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित चौकशी करण्यात आलेल्या रकुल प्रीत सिंह यांचे फोन्सही NCB ने ताब्यात घेतले आहे.