Bollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त
Deepika Padukone, Shraddha Kapoor, Sara Ali Khan, Rakul Preet Singh (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या संशयित मृत्यूप्रकरणी सुरु असलेला तपास वेगवेगळी वळणं घेत असून आता या प्रकरणात ब़ॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरण (Drugs Case) समोर आले आहे. नारकोटिक्स विभागाने याबाबत अधिक चौकशीसाठी काल ( 26 सप्टेंबर) दीपिका पादुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांना NCB कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार या तिघींची चौकशी करण्यात आली. आता सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, दीपिका, श्रद्धा, सारा, रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), सिमोन खंबाटा (Simon Khambata) आणि जया शाह (Jaya Shah) यांचे मोबाईल्सही जप्त करण्यात आले आहे.

ANI ने याबाबत माहिती दिली असून दीपिका पादुकोणचे कथित 'ड्रग्ज चॅट' (Drugs Chat) NCB च्या हाती लागले होते. त्या दिशेने हा तपास सुरु झाला आहे. त्यासाठी काल दीपिका पादुकोणची चौकशी देखील करण्यात आली. Bollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा

या सर्वांचे फोन्स जप्त केल्यानंतर NCB ची टीम आता या सर्वांच्या मोबाईल्समधील मेसेजेस तपास करेल. या कलाकारांच्या चॅटमधून त्यांना ड्रग्ज संबंधित माहिती मिळेल असा संशय NCB आहे.

या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या रिया चक्रवर्तीबाबत मोठी बातमी समोर आली होती की, तिच्या घरात छापा टाकल्यानंतर NCB ने एक मोबाईल जप्त केला होता. ज्यात त्यांना ड्रग्ज संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. ड्रग्ज प्रकरणी रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह अनेक जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.