Bollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक, NCB चा दावा
Mutha Ashok Jain, Deputy DG, South-Western Region, NCB (Photo Credits: ANI)

Bollywood Drug Case:  बॉलिवूड मधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सुरु करण्यात आलेल्या तपासणीत ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर आता NCB कडून बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा करण्याच्या पाठी लागले आहेत. या प्रकरणी 18 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आल्याचा दावा एनसीबी  (NCB) कडून करण्यात आला आहे. याबद्दल साउथ-वेस्टर्न विभागाचे एनसीबीचे अधिकारी मुथुआ अशोक जैन यांनी सांगितले आहे. करिश्मा प्रकाश, सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि श्रद्धा कपूर यांचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आला आहे.

क्षितिज प्रसाद याला चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. आज नव्याने समन्स पाठवण्यात आलेले नाही. आम्ही आतापर्यंत 18 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे जैन यांनी म्हटले आहे. शनिवारी एनसीबीने धर्मा प्रोडक्शनचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर क्षितिज रवी प्रसाद याला ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आले.(Bollywood Drugs Case: अभिनेत्री दीपिका पादुकोण पाच तासांच्या चौकशीनंतर अखेर NCB कार्यालयातून बाहेर पडली, ड्रग्ज प्रकरणाबाबत झाली चौकशी)

तसेच आता एनसीबीकडून दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, करिश्मा प्रकाश, रकुल प्रित सिंह, सिमोन्स खंबाटा आणि जया शहा यांचे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(अभिनेत्री Rakul Preet Singh ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; NCB अहवाल सादर करेपर्यंत, माध्यमांना आपल्या बातम्या प्रसारित न करण्याच्या सूचना देण्याची केली विनंती)

ईडीला सुशांतच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासात ड्रग्ज संबंधित चॅटचे कळल्यानंतर त्याचा अधिक तपास करण्यात आला. तर सध्या एनसीबीकडून या ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश केला जात असून संबंधित लोकांची चौकशी करण्यासह त्यांना अटक ही करण्यात येत आहे. तर सुशांत सिंह राजपूत याचे वडील केके सिंह राजपूत यांनी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात बिहार मध्ये 28 जुलै रोजी एफआयआर दाखल केला होता. तर सुशांत याने त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.