![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/School-Bags-380x214.jpg)
अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटना आपण ब-याचदा ऐकल्या आहेत. मात्र कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एका शाळेमध्ये पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या विषबाधेने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. सानिका माळी असे या मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात सानिकाचा उपचारादरम्यान 25 फेब्रुवारीला मृत्यू झाला. संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तिच्या नातचेवाईकांना तिचा मृतदेह शाळेच्या दारात नेऊन ठेवला होता.
शिरोळ तालुक्यातील शिरटीमध्ये पाच दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता.सानिका माळी ही दहावीत शिकत होती. 5 दिवसांपूर्वी तिच्या शाळेत प्रात्यक्षिक परीक्षा होती. प्रात्यक्षिकानंतर वर्गात आलेल्या सानिकाने आपल्या दप्तरातील बाटलीतून पाणी प्यायली. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घरी गेली. परभणी: पूर्णा येथील मागासवर्गीय शासकीय निवासी शाळेतील 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
सानिकाची प्रकृती गंभीर खालावल्यामुळे तिला शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिला पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
या घटनेचे संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करित आहेत.
महिन्याभरापूर्वी परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पूर्णा (Purna) तालुक्यातील मागासवर्गीय शासकीय निवासी शाळेतील (government residential school) 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र विषबाधित विद्यार्थ्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.