Wardha Accident: एसयूव्ही गाडी पूलावरुन कोसळली, वर्धा-देवळी मार्गावर अपघातात सात जण जागीच ठार; मृतांमध्ये आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश
Wardha Accident |

एसयूव्ही  (SUV) गाडी पुलावरुन कोसळून (Car Crashes) झालेल्या अपघातात (Wardha Accident) सात जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमधील सर्वजण हे तरुण असून त्यात एका आमदारपुत्राचाही समावेश आहे. यातील तिघे सांगवी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे समजते. वर्धा-देवळी (Wardha-Deoli Road) मार्गावर रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, सर्वजण जागीच मृत ठार झाले. प्राप्त माहितीनुसार, सेलसुरा येथील रस्ता दुभाजकाला गाडीची धडक बसली आणि गाडी पुलावरुन खाली कोसळली. ही घटना कळल्यावर नागरिक जेव्हा मदत आणि बचाव कार्यासाठी धावले तेव्हा गाडीचा चेंदामेंदा झाला होता आणि सर्वजण गतप्राण होते.

सावंगी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, अपघातात सर्वांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमधील सर्वजण मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Accident on Pune-Ahmednagar Road: पुणे-अहमदनगर रोडवर अपघात; कार आणि दुचाकीला ट्रकची धडक, 5 ठार तर 4 जखमी)

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, सर्वांचे मृतदेह सांगवी येथली रुग्णालयामध्ये आणण्यात आले. पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे. पंचनामाही केला आहे. दरम्यान, सर्वांचे मृतदेह शवविच्छेधनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. प्रकरणाचा तपास सुरु आहे.