सोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप
Prakash Ambedkar and Sushilkumar Shinde | | (Photo credit: archived, edited and representative images only)

Lok Sabha Ealections 2019: सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना EVM वरील कपबशी किंवा हाताचा पंजा या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबले तरी, प्रत्यक्षात मत मात्र भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळालाच मत जात असल्याच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा आरोप बहुजन वंचित आघाडी (Vanchit Bahujan Aghadi)उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सोलापूर मतदारसंघ (Solapur Lok Sabha Constituency) दुसऱ्या टप्प्यातच येत असल्याने आज येथे मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनीही कपबशीसमोरील बटण दाबले तरी कमळालाच मत जात असल्याचा आरोप केला आहे.

एकाच वेळी काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केल्याने आरोप आणि घटनेचे गांभीर्य वाढले आहे. अशा प्रकारची घटना घडल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या मतदारसंघातील EVM सील केले आणि त्या ठिकाणी नवीन EVM मशीन उबलब्ध करुन दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. (हेही वाचा, बुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी)

प्रकाशा आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडक यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना, 'कपबशी या चिन्हासमोरील बटण दाबले तरीही भाजपला (कमळ) मत जात असल्याचा आरोप केला होता.' तर, लोकमत डॉट कॉमने दिलेल्या वृत्तातही सुशीलकुमार शिंदे यांनी हाताचा पंजा या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबले तरी, भाजपला मत जात असल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० जागांवर मतदान होत आहे. सोलापूरमध्ये सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना वाढल्याचा आरोप होत आहे.