एकादशीचे व्रत करणे हा वारकरी संप्रदायातील लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. पंढरपूरात आज वैशाख शुद्ध मोहिनी भागवत एकादशी साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पांढ-या-शुभ्र अशा मोग-याच्या फुलांनी आणि गोंड्यांनी सजविण्यात आले आहे. कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसलं तरी या माध्यमातून आपण ही देवाच मनमोहक रूप घर बसल्या पाहू शकतो.श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा चौखांबी हा सर्व परिसर मोगर्याच्या सुगंधाने दरवळला आहे.
देशावर आलेले कोरोना संकट परतवून लाव अशी प्रार्थना आज अनेक भाविक विठुरायापुढे करत आहे. याच सावटाखाली भक्तांना प्रत्यक्षरित्या विठुरायाच्या मंदिरात येता येत नसले तरी आपण घरबसल्या या फोटोच्या माध्यमातून विठुरायाचे दर्शन घेऊ शकाल.हेदेखील वाचा- Bhagwat Ekadashi 2020: ‘भागवत एकादशी’ निमित्त जाणून घ्या पूजाविधी आणि एकादशीच्या व्रताचे महत्त्व
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार दि-२३ मे २०२१
🌸नित्य पुजा🌸
🌹काकडा आरती🌹
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩भागवत एकादशी🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/mABNhDoAYv
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) May 23, 2021
या मंदिरात मोगरा झेंडू गुलाब अशा विविध फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. या मोगऱ्यांच्या फुलांच्या सजावटमुळे मंदिराचा सर्व परिसर प्रसन्न दिसत आहे. दरवर्षी मोहिनी भागवत एकादशी निमित्त आकर्षक सजावट ही केली जाते. मोहिनी भागवत एकादशी निमित्त भाविक दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भागवत एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी मोगऱ्याच्या फुलाची आरास करण्यात आली आहे...*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/22gimeKgCQ
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) May 22, 2021
वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.
याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.