Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

वसई पूर्व (Vasai East) भागातील वालीव पोलीस ठाण्यासमोर (Waliv Police Station) उभा करण्यात आलेल्या वाहनांना लागल्याची माहिती समोर आली आहे. आज (14 मार्च) दुपारी ही आग लागली आहे. या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली आहेत. आगीत जळालेली सर्व वाहने पोलीस कारवाईत जप्त केलेल्या तसेच अपघातांमधील आहेत. ही आग कशामुळे लागली? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. वसई-विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या घटना समोर येत आहेत. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वालीव पोलीस ठाण्यासमोर उभा करण्यात आलेल्या वाहनांनी आज पेट घेतला होता. एका पाठोपाठ एक अशी ही वाहने उभी करण्यात आलेली असल्याने आग पसरत गेली. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत जवळपास 35 वाहन जळून खाक झाली आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mukesh Ambani House Case: Sachin Waze यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी, काल रात्री झाली होती अटक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना समोर येत आहेत.  पुण्यातील जंगली महाराज रोड येथे पोलीस कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याची माहिती समोर आली होती. या आगीत जवळपास 15 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.  या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.