Cloudy Weather | (File Image)

Vidarbha Weather Prediction, June 22: विदर्भ मध्ये पण पावसाने गेल्या काही दिवसापासून दांडी मारली आहे. मात्र जेव्हा विदर्भात पाऊस दाखल झाला तेव्हा पावसाचा वेग खूप जोरात होता आणि त्यामुळे खूप नुकसान झाले होते.नैऋत्य मान्सूनने मध्य आणि पूर्व विदर्भात प्रवेश केलेला नाही, कारण बंगालच्या उपसागरामुळे पुरेशी हवामान परिस्थिती निर्माण होत नसल्याने मान्सूनला उर्वरित विदर्भात पोहोचण्यासाठी आणखी 3-4 दिवस लागतील.साधारणपणे, मान्सून 15 जूनपर्यंत विदर्भात दाखल होतो.पण या वर्षी मान्सून पूर्व पावसाने विदर्भात काही दिवसा पूर्वी धुमाकूळ घातला होता. या वर्षी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की चंद्रपूर, बुलढाणा, ब्रह्मपुरी, अकोला आणि अमरावती यासारख्या ठिकाणांसह दक्षिण आणि पश्चिम विदर्भात 11 जून रोजी मान्सून लवकर सुरू झाला. खरतर अरबी समुद्रातील हवामान प्रणाली कमकुवत झाली आहे आणि त्यामुळे 14 जूनपासून मान्सून अमरावती आणि चंद्रपूरच्या पुढे सरकलेला नाही. बंगालच्या उपसगरच्या अयोग्य हवामानमुळे मान्सून 23 किंवा 24 जूनच्या सुमारास नागपूर शहरात पोहोचण्याची शक्यता आहे. एका हवामान तज्ज्ञाने सांगितले की, मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा करण्यापूर्वी ते काही विशिष्ट चिन्हे शोधतात. पण नागपुरात अद्याप ही तसे कोणते चिन्हे दिसत नाहीत.हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या अंदाज

नागपूर सह आजुबाजूच्या भागातील हवामान अंदाज:

सध्या विदर्भातील काही भागात पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात हवेतील दमटपणामुळे काहीसा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या 24 तासांत गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 46 मिमी, ब्रह्मपुरी (25 मिमी), चंद्रपूर (28 मिमी), भंडारा (3 मिमी), नागपूर (1 मिमी), गोंदिया (1.6 मिमी), आणि वर्धा (1.6 मिमी) येथे पाऊस झाला. 3.2 मिमी). पाऊस आणि ढगांमुळे बुधवारी विदर्भातील सर्वाधिक तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या खाली होते.