Pune Weather Prediction, June 22 : थोड्या विश्रांतीनंतर आता पुण्यात मुसळधार पावसाचं धुमशान होण्याचा अंदाज आहे. कारण नैऋत्य मान्सूनची अरबी शाखा 22 जूनपासून पुनरुज्जीवित होणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) जूनमध्ये शहरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुण्यात 23 जूनपासून पावसाच्या जोरात वाढ होण्याची अपेक्षा आहे. घाट भागात 23 ते 25 जून दरम्यान पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे, त्यानंतर 25 जूनपासून शहरात जोरदार पाऊस पडेल,” असे IMD पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा प्रमुख केएस होसाळीकर यांनी सांगितले.पुण्यात आज 21 जून 2024 रोजी तापमान 28.53 अंश से. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.62 °C आणि 30.47 °C दर्शवतो. पुण्यात आज वातावरण ढगाळ रहाण्याची शक्यता आहे. आता नेमके उद्या पुण्यात हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान खात्याने पुणे शहराचे उद्याचे हवामान ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast Today: आज मुंबई शहरात मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट
पुण्याचे उद्याचे हवामान कसे पहा?
पुण्याचे पुढचे 5 दिवसाचा हवामान अंदाज:
22 जून 2024 30.01 °C हलका पाऊस
23 जून 2024 29.19 °C हलका पाऊस
24 जून 2024 29.16 °C हलका पाऊस
25 जून 2024 30.6 °C हलका पाऊस
26 जून 2024 29.18 °C हलका पाऊस
27 जून 2024 24.71 °C मध्यम पाऊस
28 जून 2024 24.7 °C हलका पाऊस
महाराष्ट्र मध्ये आता सगळी कडे पाऊस दाखल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. आता शेतीची कामे चालू होतील.पण काही ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय,काही से असे ठिकाण आहेत जिथे कमी वेळात खूप जास्त पाऊस पडल्याने लोकान खूप त्रास होतोय.त्यामुळे घरातून बाहेर पडण्या आधी वातावरण कसे आहे ह्याचा अंदाज जाणून घ्या आणि मगच घरा बाहेर पडा.आयएमडी वेबसाइटनुसार, पुणे आणि त्याच्या आसपासच्या पाषाण, कोरेगाव, मगरपट्टा, एनडीए, चिंचवड, लोहेगाव आणि लव्हाळे या भागात अंशतः ढगाळ आकाश असेल आणि दुपार आणि संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण असेल, एक किंवा दोन हलक्या सरी पडतील.