Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने मुंबईत (Mumbai) आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. त्यामुळे मुंबई शहराला यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज मुसळधार व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यंदा मुंबईत पाऊस लवकर दाखल झाला परंतु त्याची तीव्रता कमी झाली होती. येणाऱ्या आवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. वर्षभरात सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज दर्शवला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 आणि 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.यलो अलर्ट दिल्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना साधव राहण्याचा इशारा दिला आहे. आज मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचू शकते आणि वाहतुक सेवा विस्कळीत होवू शकते. (हेही वाचा- रत्नागिरी मध्ये उद्याचे हवामान कसे असेल? Meteorology Department कडून यलो अलर्ट जारी)
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)