Shiv Sena on BJP: पाच राज्यांत भाजपच्या यशावर शिवसेनेची 'सामना'तून तिखट प्रतिक्रिया म्हटले, 'माकडाच्या हाती दारूची बाटली आल्यावर..'
Shiv Sena | (File Photo)

पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकीत (Assembly Election results 2022) एका राज्याचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे. मात्र, विरोधकांच्या पोटात गोळा यावा अशी स्थिती आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा अपवाद वगळता भाजप (BJP) विरोधातील एकाही पक्षाला किमान यशही या निवडणुकांमध्ये मिळवता आले नाही. दरम्यान, भाजपच्या या यशावर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दैनिक सामना (Daily Saamana Editorial) संपादकीयामधून तिखट प्रतिक्रिया (Shiv Sena on BJP) व्यक्त करण्यात आली आहे. 'पराजय पचवणे सोपे असते. विजय पचवणे कठीण. भाजपने विजय पचविण्यास शिकवावे अन्यधा विजयाचे अजीर्ण होऊ नये. नाहीतर माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे घडते तसेच काहीतरी होईल', अशा शब्दात शिवसेनेने भावना व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत थेट बहुमताने सत्ता मिळवली. उर्वरीत राज्यांमध्ये भाजप सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरला. धक्कादायक म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचा अपवाद वगळता विरोधी पक्षांचा सुफडा साफ झाला. नामुष्की टाळण्यासाठी किमान म्हणावे इतकी सुद्धा कामगिरी विरधकांना करता आली नाही. काँग्रेसने पंजाबसारखे महत्त्वाचे राज्य तर गमावलेच परंतू, दोन आकडी संख्येत सांगता येतील एवढ्याही जागा मळविण्यात काँग्रेस, बसपा आणि इतर पक्ष अपयशी ठरले. केवळ त्यांना एक, दोन, तीन अशा जागा मिळाल्या. या निकालावर आता शिवसेनेने सामनातून प्रतिक्रिया दिली आहे. (वाचा - Assembly Election Results 2022 Live News Updates: लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन भाजपचा विजय सुनिश्चित केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

'विजयाचे अजीर्ण होऊ नये' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले आहे की, ‘निवडणूक कोणतीही असो, त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती, प्रचार यंत्रणा, पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच. पंजाबातील निकाल डोळ्यात अंजन घालणारे आहेत. उत्तर प्रदेशातील जमिनीवर अखिलेश यादवांना हवेत तीर मारून चालणार नाही. अधिक गांभीर्याने त्यांना यापुढे निवडणूक लढवावी लागेल. प्रियंका गांधींनी आता कुठे लढाईला सुरुवात केली आहे. ती त्यांनी अर्धवट सोडू नये. पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे घडते तसेच काहीतरी होईल. पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये!'