Close
Advertisement
  मंगळवार, ऑक्टोबर 15, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago
Live

Assembly Election Results 2022 Live News Updates: उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाबाबत भाजपची उद्या दिल्लीत बैठक होणार

राजकीय टीम लेटेस्टली | Mar 10, 2022 08:58 PM IST
A+
A-
10 Mar, 20:58 (IST)

उद्या दिल्लीत भाजपची यूपी निवडणुकीच्या निकालाबाबत दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वतंत्र देव सिंह आणि संघटन मंत्री सुनील बन्सल उपस्थित राहणार आहेत. 

 

10 Mar, 20:43 (IST)

युक्रेन-रशिया युद्धानंतरचे परिणाम प्रत्येक देशाला भोगावे लागतील. युद्धात लढणाऱ्या राष्ट्रांशी भारताचे आर्थिक, संरक्षण, सुरक्षा, राजकीय संबंध आहेत. जगभरात कोळसा, गॅस, खतांच्या आंतरराष्ट्रीय किमती झपाट्याने वाढत आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

10 Mar, 20:35 (IST)

हे दुर्दैव आहे की हजारो भारतीय विद्यार्थी, भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले असताना देशाचे मनोधैर्य खचल्याची चर्चा होती. या लोकांनी #OperationGanga ला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. भारताच्या भविष्यासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे, असंही पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

 

10 Mar, 20:28 (IST)

सीमावर्ती राज्य असल्याने, पंजाबला फुटीरतावादी राजकारणापासून सावध ठेवण्याचे काम भाजप कार्यकर्ता करत राहील. येत्या 5 वर्षात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तिथे ही जबाबदारी पार पाडेल. हा माझा विश्वास आहे. 

 

10 Mar, 20:25 (IST)

पीएम मोदी म्हणाले की, आज मी पंजाबमधील भाजप कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करेन. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्षाचा झेंडा ज्या प्रकारे उंचावला आहे, त्यामुळे आगामी काळात ते पंजाबमध्ये भाजपची ताकद आणि देशाची ताकद एक महत्त्वाचे स्थान म्हणून विकसित करतील.

10 Mar, 20:19 (IST)

जेव्हा आम्ही 2019 मध्ये (केंद्रात) सरकार स्थापन केले तेव्हा तज्ञांनी अनेक अंदाज वर्तवले. मला विश्वास आहे की, तेच 'तज्ञ' म्हणतील की, 2022 च्या निवडणुकीचे निकाल 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांचे भवितव्य ठरवतील. 

 

10 Mar, 20:08 (IST)

गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले आहेत. उत्तराखंडमध्ये भाजपने नवा इतिहास रचला आहे. राज्यात प्रथमच एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आला आहे. 5 राज्यांतील विधानसभा निकालांवर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

10 Mar, 19:58 (IST)

10 मार्चपासून होळी सुरू होईल असे आम्ही आधीचं सांगितले होते. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन भाजपचा विजय सुनिश्चित केल्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो. उत्तर प्रदेसमध्ये प्रथमचं, दुसऱ्या टर्मसाठी मुख्यमंत्री निवडला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

10 Mar, 19:40 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना  संबोधित करणार आहेत.

10 Mar, 19:40 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना  संबोधित करणार आहेत.

Load More

गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब मध्ये मागील महिन्याभरापासून सुरू असलेली मतदानाची रणधुमाळी 7 मार्चला थांबली आहे. आता आज (10 मार्च) जाहीर होणार्‍या निवडणूक निकालाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. एकूण 690 विधानसभा जागांवर आज निकाल जाहीर होणार आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार उत्तराखंड आणि गोवा मध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश मध्ये भाजपा पुन्हा सत्ता राखण्याचा अंदाज आहे. तर पंजाब मध्ये आप मुसंडी मारणार असल्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3,7 मार्च दिवशी निवडणूक झाली. गोव्यात 14 फेब्रुवारीला गोवा, उत्तराखंड मध्ये प्रत्येकी 40 आणि 70 जागांवर निवडणूक आहे. उत्तराखंड मध्ये 117 जागांवर निवडणूका झाल्या आहेत त्याचे निकाल आज लागतील. मणिपूर मध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च दिवशी निवडणूक पार पडली आहे.

2017 मध्ये गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा असतानाही तिथे भाजप सरकार बनवण्यात यश आलं होतं. मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेत काँग्रेसवर मात केली होती. तर उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने सत्ता मिळवली होती. उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा असून पक्षांना बहुमतासाठी 202  सदस्यांचे संख्याबळ लागेल. ७० जागांच्या उत्तराखंडमध्ये बहुमतासाठी 36  जागा जिंकाव्या लागतील. पंजाबमध्ये 117 जागा असून बहुमतासाठी 59 सदस्य विजयी व्हावे लागतील. गोवा विधानसभेत 40 जागा असून बहुमतासाठी 21 जागा जिंकाव्या लागतील. मणिपूरमध्ये 60  जागा असून बहुमतासाठी 31 सदस्यांचे संख्याबळ गरजेचे आहे.


Show Full Article Share Now