Unseasonal Rain: बुलढाणा, परभणीसह राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी; रब्बी पिकांवर अवकाळी संकट
Heavy Rain | (Photo Credit: Archived, edited, representative images)

हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसांच्या सरी कोसळल्या आहेत. खास करुन बुलढाणा (Buldhana) आणि परभणी (Parbhani) जिल्ह्यात पाऊस कोसळला. ज्यामळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला तर शेतकऱ्यांसमोर संकट उभा राहिले. सध्या कंदा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीचा काळ आहे. काही शेतकऱ्यांची पिके रानात आहेत तर काहींची काढणी झालेली आहे पण मळणी बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या आव्हानाला कसे तोंड द्यायचे याबाबत चिंता सतावते आहे. शिवाय अवकाळी पाऊस असल्याने शेतकऱ्यांची तारांबळही होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीचा फटका

काल रात्रीच्या पावसाचा बुलढाणा जिल्ह्याला काहीसा अधिकच फटका बसला. प्रामुख्याने जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुरा आदी तालुक्यांमध्ये अवकाळीचा फटका अधिक बसला. अवकाळी पावसामुळे शेतीला फटका आहे. दरम्यान, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा थंडावा मिळाला आहे. प्रामुख्याने वातावरणातील दाह थोडा कमी झाला आहे. (हेही वाचा, http://Mumbai Rain: मुंबईत आज पाऊस! मुंबईकरांनी अवकाळी पावसाचे फोटो आणि व्हिडिओ केले शेअर; पहा)

परभणीत अवकाळीचा ज्वारीला फटका

परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी पावसाने आर्था पाऊण तासच हजेरी लावली. पण तीच हजेरी पिकांसाठी हानीकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खास करुन रानात असलेल्या ज्वारी पिकाला अधिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. शिवाय काढणीला आलेला गहू, हरभरा पिकांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्यात इतरही ठिकाणी अवकाळी पाऊस

केवळ बुलढाणा, परभणीच नव्हे तर सातारा, सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणीही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहरातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ज्यामुळे मुंबईकरांची उकाड्यातीन काहीशी का होईना सुटका झाली. पाठिमागील काही दिवसांपासून मुंबईचे तापमान चांगलेच वाढले होते. मात्र, त्यात काहीसा बदल होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईतील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे.