महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (28 नोव्हेंबर) शिवाजी पार्कवर शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळामध्ये महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) सहा मंत्र्यांचादेखील शपथविधी पार पडला. यानंतर आज उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. दुपारी 1च्या सुमारास उद्धव ठाकरे कार्यालयात पोहचतील अशी माहिती मीडीया रिपोर्ट्समधून पुढे येत आहेत. काल शपथविधीनंतर कॅबिनेटची बैठक झाली. या पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळामध्ये शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद ते शेतकर्यांच्या मदतीसाठी आढाव्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. या महाविकासआघाडीच्या सरकारला बहुमताचा ठराव 3 डिसेंबरपूर्वी मंजूर करावा लागणार आहे. तर नव्या विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय; सहा मंत्र्यांसह पार पडली पहिली कॅबिनेट बैठक.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे... pic.twitter.com/rgbiHoFzlX
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) November 28, 2019
काल शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात जयंत पाटील, छगन भुजबळ, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली आहे. लवकरच उर्वरित मंत्र्यांच्या शपथविधी जाहीर होणार आहे.