Uddhav Thackeray in Jalgaon: जळगाव येथे आज धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ,पाचोरा येथे जाहीर सभा; गुलाबराव पाटील समर्थकांकडून उधळण्याचा इशारा
Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

Uddhav Thackeray Rally at Pachora: महाविकासआघाडी 'वज्रमुठ' आवळत आहे. वज्रमुठ सभेला नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. सोबतच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील शिवसेना (उबाठा) पक्षासाठी सभा घेत आहेत. या सभांनाही नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे. त्यामुळे ठाकरे यांची क्रेझ अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची तोफ आज जळगव जिल्ह्यातील पाचोरा येथे धडाडणार आहे. उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे आज (23 एप्रिल) सभा पार पडत आहे. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. दरम्यान, एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत असलेले मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे पाटील समर्थकांनी उद्धव ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस सतर्क झाले असून, राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यात जोर लावला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून ठाकरे यांची जळगावमध्ये तिसरी मोठी आणि जाहीर सभा पार पडते आहे. त्यावरुनच लक्षात येते की ठाकरे यांच्यासाठी जळगाव किती मोठे आहे. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही नुकतेच म्हटले आहे की, जळगाव हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेच. आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उद्वव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे की, उद्धव ठाकरे यांच्या विचारांची मशाल कोणत्या दिशेने प्रकाशमना होते. (हेही वाचा, Radhakrishna Vikhe Patil On Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील भाजप नेता म्हणतो 'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री')

गुलाबराव पाटील समर्थकांनी इशारा दिला आहे की, गुलाबराव पाटील यांच्यावर केली जाणारी कोणत्याही प्रकारची टीका केली जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली तर आपण जाहीर सभाच उधळून लावू. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री आहेत. परिणामी उद्धव ठाकरे आजच्या सभेत गुलाबराव पाटील यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलीच गर्मी वाढली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनही सतर्क झाले असून, मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकारी आणि नेत्यांवर बारीक नजर असल्याचे समजते.