Radhakrishna Vikhe Patil On Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील भाजप नेता म्हणतो 'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री'

'एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं' असे विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. या विधानानंतर निर्माण झालेले चर्चेचे वादळ आता कुठे थंडावले आहे. तोवर महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

Radhakrishna Vikhe Patil On Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील भाजप नेता म्हणतो 'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री'
Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. असे असले तरी मुख्यमंत्री पदावरुन चर्चा मात्र भलत्याच नावांची आहे. कधी अजित पवार तर कधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाची मात्र पुरती कोंडी होत आहे. 'एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं' असे विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. या विधानानंतर निर्माण झालेले चर्चेचे वादळ आता कुठे थंडावले आहे. तोवर महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीस'च असे वक्तव्य केले आहे. राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित 'मिट द प्रेस' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाणार आणि मुख्यमंत्री होणार अशा चर्चा होत्या. या चर्चांमुळे एकनाथ शिंदे गटातील अस्वस्थता वाढली असतानाच भाजप नेत्याचे विधान आले आहे. दरम्यान, अजित पवार यांनीच प्रसारमाध्यमांपूढे आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिंदे गटाने थोडासा निश्वास सोडला असला तरी भाजपच्या मंत्र्याने केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, Ajit Pawar: राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा, अजित पवार यांच्या विधानावर संजय राऊत, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया)

राहता येथील कार्यक्रमात विखे पाटील यांना अजित पवार यांच्या मनात काय? असा सवाल विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, शरद पवार हे अवघ्या महाराष्ट्राला संभ्रमात टाकतात. पण, या वेळी अजित पवार यांनी स्वत: शरद पवार यांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्याच मनाचा तळ लागत नाही. कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही. यावर तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? असा सवाल विखे पाटील यांना उपस्थित करण्यात आला. यावर ते म्हणाले, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्कीच चांगले नेते आहेत. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. विखे पाटील यांच्या विधानावरुन शिंदे गटाची प्रतिक्रिया काय येते याबाबत उत्सुकता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2023 09:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).