
शिवसेना (Shiv Sena) एकच आहे. एकच राहील. दुसरा कुठला गट आहे त्याला मी शिवसेना मानत नाही. केवळ निवडून आलेले लोकच राजकीय पक्ष असतील तर उद्या कोणीही एखादा उद्योगपतीही पंतप्रधान होईल असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. ते निवास्थान मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत (Uddhav Thackeray Press Conference) बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नाव न घेता शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख हे पद केवळ बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभून दिसते. त्यामुळे त्यांच्या निधानंतर आम्ही हे पद तसेच ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केले. यावर निवडणूक आयोगाची मान्यता घेऊनच पाठिमागील अनेक वर्षे आपण या पदावर आहोत. त्यामुळे गद्दार लोक जे बोलत आहेत, त्याला काही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील पदे आणि घटनेचा दाखला देत म्हटले की, शिवसेना पक्षात मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. गद्दारांनी स्वत:साठी हे पद बेकायदेशीरपणे निर्माण केले. शिवाय, विभागप्रमुख हे पद केवळ मुंबई आणि मोठ्या शहरांमध्येच असते. कोणताही राजकीय पक्ष हा दोन प्रकारचा असतो. जो कायदेमंडळ म्हणजे विधिमंडळ किंवा संसद आणिक दुसरा रस्त्यावरचा. त्यामुळे जर निवडून आलेले लोकच जर खरा राजकीय पक्ष असतील तर उद्या कोणीही उद्योगपती देशाचा पंतप्रधान होईल. (हेही वाचा, Uddhav Thackeray Thane Visit: 'ठाणे येथील जाहीर सभेत लवकरच अनेकांचा समाचार' उद्धव ठाकरे यांची घोषणा; शिंदे गाटाला इशारा)
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको
ट्विट
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 8, 2023
उद्धव ठाकरे यांनी आक्रमक स्वरात सांगितले की, पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नसतो. जर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवणारच नव्हते तर मग शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा का सांगितला? शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात सुरु आहे. आमची मागणी आहे की, सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा निकाल आगोदर लागावा. निवडणूक आयोग त्यांचा निर्णय घ्यायला मोकळा आहे. परंतू, हे सर्व गद्दार लोक (शिंदे गट) न्यायालयात अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तसे घडले तर इतर गोष्टांना काहीच अर्थ राहात नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले.