Himachal Pradesh: कुल्लू (Kullu) जिल्ह्यातील डोभी (Dobhi) येथे पॅराग्लायडिंग (Paragliding) दरम्यान झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी उळी खोऱ्यातील देवगड ग्रामपंचायतीजवळील भाटगरण येथे पॅराग्लायडरचा अपघात झाला. या अपघातात पॅराग्लायडरमध्ये बसलेल्या पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू झाला. या अपघातात पॅराग्लायडरचा पायलटही जखमी झाला आहे. ज्यांच्यावर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरवळ खंडाळा येथे राहणारा सूरज शाह पॅराग्लायडिंगसाठी कुल्लूला पोहोचला होता. पॅराग्लायडरने हवेत उड्डाण केले, त्याच वेळी पॅराग्लायडरचा पट्टा उघडला. त्यामुळे पर्यटक खाली पडले. त्याचवेळी स्थानिक लोकांनी पर्यटक आणि पायलटला गंभीर अवस्थेत कुल्लू रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी पर्यटकाला मृत घोषित केले. त्याचबरोबर पायलटवर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Paragliding Turns Fatal: पॅराग्लायडिंग करताना एका तरुणाचा उंचावरून पडून जागीच मृत्यू, पोलिसांनकडून तपास सुरू)
माहिती मिळताच कुल्लू पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पर्यटकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी दिली. आता रविवारी या पर्यटकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर पर्यटकाच्या नातेवाईकांनाही कळवण्यात आले आहे. कुल्लू पोलिसांनी या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळलेला त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.