शिमला: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कांगडा जिल्ह्यातील बीर बिलिंग येथे रविवारी पॅराग्लायडरवरून पडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या बातमानुसार, मृत्यु झालेल्या व्यक्तिचे नाव संदीप चौधरी असे ओळखले जात आहे, ग्लायडरचा बेल्ट आणि हार्नेस सैल उघडल्यामुळे तो अचानक खाली पडला. कांगडा येथील नगरोटा बागवान येथील मुमता गावातील येथील संदीप चौधरी रहिवासी आहे. जो आपल्या मित्रांसह बीर येथे आला होता, त्याने पॅराग्लायडिंगला जाण्याचा निर्णय घेतला होता, जो त्याच्यासाठी जीवघेणा ठरला. (हे ही वाचा Chennai: धक्कादायक! नवऱ्याला 'अमरत्व' प्राप्त व्हावे म्हणून पत्नीने त्याला जिवंत पुरले; गुन्हा दाखल, तपास सुरु.)
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चौधरीच्या ग्लायडरचा सेफ्टी हार्नेस आणि बेल्ट काढल्यानंतर काही मिनिटांत तो सैल झाला आणि तो सुमारे 150 फुटांवरून पडला. चौधरी हे बीरजवळील घराच्या छतावर पडले. ग्लायडरवरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. झालेल्या पोलिसांन कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
मृताचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे. उड्डाणाच्या वेळी मृताच्या ग्लायडरचा हार्नेस उघडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, या जीवघेण्या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. द ट्रिब्यूनने माहिती दिली की बीर बिलिंगवरून उड्डाण केल्यानंतर कांगडा आणि मंडीमध्ये गेल्या पाच वर्षांत 30 हून अधिक ग्लायडर दुर्घटनाच्या घटना समोर आल्या आहे, आणि दहा लोकांचा मृत्यू झाला आहे.