जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिलेच्या अंगाला विनापरवानगी शिवाय स्पर्श करत असल्यास तर तो तिच्या मर्यादा आणि प्रतिष्ठेला ठेच पोहचवतो. म्हणजेच महिलेच्या सन्माचा अपमान झाल्यासारखे असल्याचे बॉम्बे हायकोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या औरंगाबद खंडपीठाने एका महिलेच्या परवानगी शिवाय तिला स्पर्श करण्यासंदर्भात आरोपी ठरवण्यात आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. न्यायाधीश मुकुंद जी सेविलकर यांच्या एकलपीठाने परमेश्वर ढगे यांच्या द्वारे जालना जिल्हा कोर्टात 21 ऑगस्टला निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आपला निर्णय सुनावला आणि फेटाळली. सेशन कोर्टाने मजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला अगदी बरोबर असल्याचे म्हणत आरोपीला आयपीसी कलम 451, 531-A अंतर्गत दोषी ठरविले.
महिलेकडून पोलिसांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, 4 जुलै 2014 मध्ये जेव्हा ती आपल्या आजी सासूसह घरात होती. त्यावेळी रात्री आरोपी त्यांच्या घरी येत त्याने नवऱ्याबद्दल विचारले. यावर महिलेने तिचा नवरा आज घरी येणार नाही असे सांगितले. त्यानंतर तो तेथून निघून गेला. पण रात्री 11 वाजताच्या सुमारास पुन्हा येत तो त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी महिला झोपली होती. महिलेला आपल्याला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले आणि तेव्हा पाहिले असता तो व्यक्ती तिच्या खाटेवर बसला होता. महिलेने म्हटले की, तिने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. महिलेने याबद्दल तातडीने नवऱ्याला सांगितले आणि त्याला घरी येण्यास सांगितले. त्याचवेळी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली गेली.(Thane: भिवंडी येथे कचऱ्या डब्यात सापडली नवजात मुलगी)
इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, आरोपीकडून त्याची बाजू मांडताना वकिलांनी कोर्टाला असे म्हटले महिलेने दरवाज्याची कडी आतमधून लावली नव्हती. त्याचसोबत महिलेच्या परवानगी शिवायच तो घरात आला होता. महिलेच्या पायाला कोणत्याही अश्लील विचाराने स्पर्श केला नव्हता. वकीलांनी पुढे असे ही म्हटले की, जेव्हा नवरा घरी नसतो तेव्हा ती घराचे दार पूर्णपणे बंद ठेवते. त्याचसोबत महिलेला जर हे चुकीचे वाटत होते तर तिने 12 तासानंतर तक्रार का दाखल केली.
दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर असे स्पष्ट होते की, याचिकाकर्त्याने महिलेच्या सन्मानाला ठेच पोहचवल्याचे काम केले आहे. याचिकाकर्ता परवानशी शिवाय महिलेच्या घरात आला आणि तिच्या खाटेवर बसून पायाला स्पर्श केला. त्याचे हे वागणे अश्लील पद्धतीचे असल्याचे दिसून येते. कोर्टाने पुढे असे म्हटले की, याचिकाकर्त्याने या प्रकरणी समाधानकारक उत्तरे सुद्धा दिली नाही की, तो रात्री तिच्या घरी काय करत होता. याचिकाकर्त्याला माहिती होते तिचा नवरा घरी नाही तरीही तो तेथे जात त्याने तिला स्पर्श केला. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे मानत त्याला आरोपी मानत त्याची याचिका कोर्टाने फेटाळली.