Tokyo Olympics 2020: नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी! उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याकडून कौतूकाचा वर्षाव
नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताचा नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. नीरजने 87.58 चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले आहे. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचे अभिनंदन केले जात आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नीरजचे तोंडभरून कौतूक केले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या नीरज चोप्रासह वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. हे देखील वाचा- Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्यांसाठी बीसीसीआयकडून बक्षीस जाहीर; पाहा खेळाडूंची यादी

उद्धव ठाकरे यांचे ट्वीट-

अजित पवार यांचे ट्वीट-

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

शरद पवार यांचे ट्वीट-

‘आर्मी मॅन’ नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला आनंद साजरा करण्याची संधी दिली. त्याने आपले सुवर्णपदक ‘फ्लाइंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक आहे. नीरजच्या आधी अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.