आज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर (Mumbai Railway Mega Block) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway) माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे. चुनाभट्टी ते वांद्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान ट्रान्स हार्बर (Tranc-Harbour Line) मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार ब्लॉकच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर केला जाईल. मध्य रेल्वेने आज (रविवार) माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गांवर लोकल फेऱ्या सुरू राहतील.
पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन द्रुतगती मार्गावर मेगाब्लॉक असणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लेनवरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गांवर वळवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकलच्या फेऱ्या सुमारे 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. (हे ही वाचा BMC Guidelines For Self-Test Kits: सेल्फ-टेस्ट किट खरेदी आणि तपासणीबाबत मुंबई महापालिकेची नवी नियमावली, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती)
हार्बर रेल्वेवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहेत. सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगाव या लोकलच्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द केल्या जातील. कुर्ल्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ते पनवेलपर्यंत विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.