Kishori Pednekar | (Photo Credit -ANI/ Twitter)

मुंबई शहरात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांसंदर्भाद मुंबई महापालिकेने काही महत्त्वाचे निर्णय (BMC Guidelines For Self-Test Kits) घेतले आहेत. याबाबत मुंबई महापालिकेच्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी घोषणा केली आहे. अलिकडे कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे किंवा नाही याबाबत सेल्फ-टेस्ट किट (Self-Test Kits) खरेदी करुनही तपासणी केली जात आहे. अशा वेळी सेल्फ किट खरेदी करताना नागरिकांनी संबंधित केमिस्टना त्यांचा अधार (Aadhaar ) कार्ड क्रमांक देणे आवश्यक आहे. तसेच, घरगुती चाचण्या किंवा रॅपिड अन्टीजेन संच उत्पादक, विक्रेते यांना संचाच्या विक्रीबाबतचे तपशील मुंबई महापालिकेला देणे बंधनकारक असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, जे नागरिक सेल्फ किटद्वारे तपासणी करतील आणि या तपासणीत ज्यांची चाचणी पॉझिटीव्ह येईल अशा नागरिकांनी याबाबतची माहिती महापालिकेला देणे आवश्यक आहे. त्यासाठी या नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी किंवा त्याबाबत ऑनलाईन अपडेट करावी असेही पेडणेकर म्हणाल्या.  (हेही वाचा, Corona Virus Update: कोरोनाची एकही चाचणी न केल्यामुळे राज्य सरकारची 15 खाजगी प्रयोगशाळांना नोटीस, परवाना रद्द करण्याचा दिला इशारा)

आतापर्यंत जवळपास 1 लाखांपेक्षाही अधिक नागरिकांनी सेल्फ टेस्ट केली आहे. त्यापैकी तब्बल 3549 जण पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे महामारीच्या अशा वाईट काळातही कोणी वेगळा काही धंदा करणार असेल तर त्यांच्यावर तडक कारवाई केली आजई असा थेट इशारा महापौरांनी या वेळी दिला. यापुढे सेल्फ किट खरेदी करण्यास नवे नियम लागू असतील. त्यामुळे या चाचण्यांचे संच उत्पादक कंपन्या, औषध विक्रेते वितकर आदी मंडळींना विक्री केलेल्या संचांबाबत तपशीलवार माहिती मुंबई महापालिकेला देणे बंधनकारक असल्याचे महापौरांनी सांगितले.

मुंबईतील केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स/डिस्पेन्सरी आदिंना विक्री करण्या आलेल्या किटबाबत फॉर्म A मध्ये आयुक्त , अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना ईमेल आयडीवर उपलब्ध करुन द्यायचा आहे. त्यासाठी whogmp.mahafda@gmail.com या ईमेल आयडीचा वापर करायचा आहे. याशिवाय च MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला सुद्धा अशा प्रकारची माहिती उत्पादकांनी उपलब्ध करुन देणे अत्यंत आवश्यक आहे. तसे करणे बंधनकारक आहे.