Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,043 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,02,267 वर
Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज 1,043 नवीन कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली. आज शहरामधून 965 बरे होऊन घरी गेले आहेत व 41 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,02,267 झाली आहे. सध्या मुंबईमध्ये 23,865 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत. आतापर्यंत मुंबईमध्ये 72,650 रुग्ण बरे झाले आहेत व एकूण 5,752 मृत्यूंची नोंद झाली आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली. आज मृत्यू झालेल्या पैकी 36 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 27 रुग्ण पुरुष व 14 रुग्ण महिला होत्या.

मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 24 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 14 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 71 टक्के आहे. 14 जुलै ते 19 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.21 टक्के होता. 19 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,38,261 होत्या, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 57 दिवस झाला आहे.

एएनआय ट्वीट-

सध्या मुंबई मधील विविध कोरोना सुविधा केंद्रातील क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, 19 जुलै पर्यंत शहरात एकूण बेड्सची क्षमता 16,862 आहे. आयसीयु बेड्स/व्हेंटीलेटर बेड्सची संख्या 1737/1053 आहे, तर ऑक्सिजन बेड्सची संख्या 11,254 आहे. सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या संख्या 667 आहे व सक्रिय सीलबंद इमारती 6173 आहेत. (हेही वाचा: मुंबई येथील धारावी परिसरात आणखी 12 कोरोबाधितांची नोंद; आतापर्यंत 2 हजार 492 जणांना संसर्ग)

दरम्यान, महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचे झाले तर, राज्यात आज 176 मृत्यूंची व नवीन 8240 रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण कोरोन संक्रमित रुग्णांची संख्या 3,18,695 झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 1,75,029 रुग्ण बरे झाले असून, सध्या 1,31,334 सक्रीय रुग्ण आहेत.