Tigress Attack: चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी एका वनरक्षक महिलेवर वाघिणीने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तिच्यासोबत आणखी तीन जण सुद्धा वाघांच्या सर्वेसाठी गेले होते. त्याच वेळी ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृत वनरक्षक महिलेचे नाव स्वाती ढुमणे असे आहे.(Kalyan Viral Video: आरपीएफच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवासाचे प्राण, पाहा व्हिडिओ)
ढुमणे या त्यांच्या अन्य तीन सहकाऱ्यांसोबत शनिवारी सकाळी 7 वाजता ऑल इंडिया टायगर इस्टिमेशन-2022 च्या सर्वेसाठी गेल्या होत्या. कोलारा गेटपासून ते कपार्टमेंट क्रमांक 97 पर्यंत चार किमी पुढे गेल्यानंतर तेथे ताडोबाच्या मुख्य परिसरातच एक वाघिण त्यांच्यापासून 20 किमी अंतरावर रस्त्यातच बसली होती. त्या सर्वांनी जवळजवळ अर्धा तास वाट पाहिली आणि जंगलाच्या दाट भागातून वळसा घालण्याचा प्रयत्न केला. असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सीसीफ जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.
Tweet:
व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर आज सकाळी 7:45 वाजता वाघाचा हल्ला महिला वनरक्षक ठार झाली आहेत. हि घटना ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक 97 या परिसरात घडली असून, मृतक महिला वनरक्षकाचे नाव स्वाती ढुमणे pic.twitter.com/RoeXVpAAXt
— AIR News Pune (@airnews_pune) November 20, 2021
वाघिणीने हालचाल पाहिली असता त्यांचा पाठलाग करत ढुमणे यांच्यावर हल्ला केला. त्या तीन सहकार्यांसोबत पुढे जात होत्या. वाघिणीने ढुमणे यांना खेचत जंगलाच्या दिशेने नेले असे त्यांनी सांगितले. नंतर याबद्दल वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना कळवण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत ढुमणे यांच्या मृतदेहाचा तपास घेतला. ढुमणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सर्वे सध्या या घटनेमुळे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून काळजी घेत असल्याचे रामगावकर यांनी म्हटले. सर्व तातडीची मदत ढुमणे यांच्या परिवाराला केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात असल्याचे सीसीएफ यांनी स्पष्ट केले आहे.