Badlapur Theft: बदलापूर पूर्व येथील राजेश वॉच शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सात चोरट्यांनी मिळून दुकानात चोरी केली. रात्रीच्या वेळीस शोमरूमचे शटर तोडून चोरट्यांनी २३ लाख रुपयांची ३०० महागडी घड्याळे लंपास केली. दुसऱ्या दिवशी सकाळी या घटनेची माहिती शोरूम मालक राजेश चावला यांना मिळाली. हेही वाचा- धक्कादायक! ग्वाल्हेरमध्ये चालत्या कारमध्ये 13 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश चावला यांना माहिती मिळताच, चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. राजेश यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळीस त्यांना सात चोरटे फुटेजमध्ये दिसले. शटरचे कुलुप तोडले आणि त्यानंतर शोरुमध्ये प्रवेश करताना चोरटे दिसले. चोरटे तोंड लपवण्यासाठी ब्लॅंकेटचा वापर करत असल्याचे व्हिडिओत दिसले. त्यांनी घड्यांळांनी पिशवी भरली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

 

घटनेची माहिची बदलापूर पोलिसांना देण्यात आली. बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना परिसरात पसरताच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.