Gang-Raped in Moving Car at Gwalior: ग्वाल्हेर (Gwalior) मध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, आरोपीने अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ चित्रित केला आणि तिच्या कुटुंबियांना पाठवला. त्यानंतर, या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध बलात्कार, अपहरण आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोहना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय पीडितेची इंस्टाग्रामच्या माध्यमातून तीन आरोपींपैकी एकाशी मैत्री झाली. घटनेच्या दिवशी आरोपीने तिला भेटायला बोलावले. तिथे तो इतर दोन मित्रांसह कारमध्ये थांबला होता. अल्पवयीन मुलगी पोहोचताच त्यांनी तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेले. ती आत गेल्यानंतर त्यांनी तिला महामार्गावर नेले आणि तिच्यावर एकामागून एक सामूहिक बलात्कार केला. (हेही वाचा -Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील नांद्याल येथे तीन अल्पवयीन मुलांकडून 8 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; दृश्यकृत्य केल्यानंतर केली पीडितेची हत्या)
व्हिडिओद्वारे पीडितेला केले ब्लॅकमेल -
घटनेदरम्यान आरोपीने पीडितेचा व्हिडिओ बनवला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यावर त्यांनी हा व्हिडिओ तिच्या कुटुंबीयांना पाठवला. यानंतर कुटुंबीयांनी मुलीला पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा -Hyderabad Horror: पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असलेल्या बापाची पोटच्या मुलीवर सेक्सची जबरदस्ती; नकार दिल्याने केली हत्या)
मोहना पोलिस स्टेशनचे प्रभारी रशीद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विद्यार्थिनी तिच्या कुटुंबासह पोलिस ठाण्यात आली आणि तिने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे. आरोपी हा पीडितेचा इंस्टाग्रामवरील फ्रेंड होता. ओळख झाल्यानंतर तरुणाने त्याच्या आणखी एका मित्राची भेट घडवून आणली होती. मैत्री झाल्यानंतर दुसरा तरुण तिला दोनदा भेटायला आला होता. घटनेच्या दिवशीही आरोपी मित्रासोबत आला होता. हे सर्व जण पिडितेला गाडीत घेऊन गेले. तिथे तिन्ही तरुणांनी तिच्यासोबत बलात्कार केला आणि तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ते लवकरच पकडले जातील, असंही रशीद खान यांनी सांगितलं आहे.