Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील नांद्याल येथे तीन अल्पवयीन मुलांकडून 8 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; दृश्यकृत्य केल्यानंतर केली पीडितेची हत्या
8-year-old girl gang-raped by three minors (PC - X/@umasudhir)

Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) नांद्याल जिल्ह्यातील (Nandyal Disrtict) पागिडयाला मंडलातील मुचुमरी गावात रविवारी एका 8 वर्षीय मुलीवर (इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीवर) शाळेतील 3 अल्पवयीन मुलांनी बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना पकडल्यानंतर बुधवारी या घटनेचा उलगडा झाला. पीडित 8 वर्षीय विद्यार्थिनी जुनी मुचुमुरी येथील तिच्या राहत्या घरातून रविवारी तिच्या मित्रांसह स्थानिक उद्यानात खेळण्यासाठी गेली होती.

सायंकाळनंतरही ती घरी न आल्याने चिंतित झालेल्या तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने मुलीचा शोध सुरू केला. त्यांनी अनेक ठिकाणी तपास केला. शोध मोहिमेत मदत करण्यासाठी श्वान पथकाचा वापर केला. कुत्र्यांनी पोलिसांना केवळ गुन्ह्याच्या ठिकाणीच नेले नाही तर आरोपींच्या घरीही थांबून संभाव्य संशयितांची ओळख पटविण्यात मदत केली. (हेही वाचा -UP Shocker: गृहपाठ अपूर्ण राहिला म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा दात तुटला, बेशुद्ध झाला)

पहा व्हिडिओ - 

प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी 8 वर्षीय मुलीची हत्या कशी केली? आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली? याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. TOI च्या वृत्तानुसार, मुलांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी तिचे तोंड झाकले आणि मुचुमरी पाटबंधारे प्रकल्पाजवळील निर्जन ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. नंतर ही घटना आई-वडिलांना सांगेल या भीतीने अल्पवयीन मुलांनी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह सिंचन कालव्यात टाकून दिला. (हेही वाचा -  (हेही वाचा: Andhra Pradesh Shocker: जमिनीसाठी मोठ्या बहिणीवर कुऱ्हाडीने हल्ला, आंध्र प्रदेशातील भीषण घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

कालव्यातील पाण्याची पातळी खोल असल्याने अद्याप पोलिसांना पीडितेचा मृतदेह बाहेर काढता आलेला नाही. तसेच पावसाच्या पाण्यामुळे तो काही अंतरावर वाहून गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार, मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोध मोहिम सुरू आहे.