Representative Image

UP Shocker: उत्तर प्रदेशातील रायबरेली (Raebareli)येथील एका खाजगी शाळेतील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्याला त्याच्या अपूर्ण गृहपाठामुळे त्याच्या शिक्षकाने बेदम मारहाण (Teacher Beats Student)केली. मारहाणीत त्याचा तुटला त्याशिवाय त्याच्या शरिरावर अनेक जखमा झाल्या, असे पोलिसांनी सांगितले. वृत्तानुसार, शिक्षकाने मुलाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली की तो बेशुद्ध पडला आणि जमिनीवर कोसळला. त्यानंतर शिक्षकाने घटनास्थळावरून पळ काढला. विद्यार्थ्यांनी याची माहिती मुख्याध्यापकांना दिली, त्यांनी जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा: Andhra Pradesh Shocker: जमिनीसाठी मोठ्या बहिणीवर कुऱ्हाडीने हल्ला, आंध्र प्रदेशातील भीषण घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

पोलिसांनी बुधवारी विज्ञान विषय (रसायन आणि भौतिकशास्त्र) शिकवणाऱ्या मोहम्मद आसिफ असे शिक्षकाला अटक केली. सलून स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO), जेपी सिंग यांनी सांगितले की, विद्यार्थ्याला एप्रिलमध्ये गृहपाठ देण्यात आला होता. जेव्हा शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद होती. मंगळवारी विद्यार्थी शाळेत पोहोचल्यावर शिक्षकाने त्याला याबाबत विचारणा केली.

'जेव्हा मुलाने काही वैयक्तिक समस्यांमुळे गृहपाठ पूर्ण करू शकत नसल्याचे सांगितले तेव्हा शिक्षकाने त्याचा संयम गमावला आणि त्याला काठीने मारले. परिणामी विद्यार्थी बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या,' असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एसएचओ म्हणाले की, शाळेने शिक्षकाविरुद्ध चौकशीही सुरू केली आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाची क्रूरपणे मारहाण करण्यात आली आणि मंगळवारी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु एका दिवसानंतर त्याला सोडण्यात आले.