Inflation | (Photo Credits: ANI)

Inflation Rate in India: भारतातील घाऊक महागाईचा (Inflation) दर सलग तिसऱ्या वर्षी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार घाऊक मालाच्या किमती मे महिन्यात सलग दुसर्‍यांदा कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीने बुधवारी दाखवले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार मे महिन्यात हा दर उणे 0.92 च्या तुलनेत मे महिन्यात उणे 3.48 टक्क्यांवर तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

दरम्यान, अन्न निर्देशांक एप्रिलमध्ये 0.17% च्या वाढीच्या तुलनेत वर्षभरात 1.59% घसरला. इंधन आणि उर्जा विभागात मागील महिन्यात 0.93% च्या वाढीच्या तुलनेत 9.17% नी घसरण पाहायला मिळाली. मे मध्ये उत्पादित उत्पादनांच्या किमती 2.97% कमी झाल्या, असे डेटा दर्शवितो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण आशियाई देशात चलनवाढीचा दबाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. (हेही वाचा, 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार लवकरचं लागू करणार 8वा वेतन आयोग, वाचा सविस्तर)

ट्विट

एएनआयच्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, या आठवड्यात, वार्षिक किरकोळ चलनवाढीचा दर मे महिन्यात 4.25% राहीला. जो दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला कारण अन्नावरील खर्चाचा दबाव कमी झाला आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्याच्या जवळ गेला. या महिन्याच्या सुरुवातीला, मध्यवर्ती बँकेने सलग दुसर्‍या पॉलिसी बैठकीसाठी आपला मुख्य कर्जदर स्थिर ठेवला, परंतु चलनवाढीच्या दबावाला आणखी आळा घालण्यासाठी आर्थिक परिस्थिती काही काळ कडक राहील असे संकेत दिले. त्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.