Vashi: वाशीत महिलेचे नग्नअवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

वाशी (Vashi) येथे 2 ऑगस्ट रोजी एका वृद्ध महिलेचा मृतदेह (Dead Body) नग्नअवस्थेत आढळून आला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आरोपीने मृत महिलेला जेवायला बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने विरोध करताच आरोपीने तिची हत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाशी रेल्वे स्टेशन लगत पामबीच मार्गावरील पुलाखाली 2 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या महिलेच्या दोन्ही हातावर टॅटू असल्याचे निदर्शनास आले. याच टॅटूच्या आधारे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी मृत महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यात मृत महिला 29 जुलै रोजी एका पुरुषासोबत चालताना दिसली. त्यावर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी 21 ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आपणच या महिलेची हत्या केल्याची त्याने कबूली दिली. हे देखील वाचा- Police Constable Dies By Suicide: मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या, तपास सुरू

कानीफनाथ दिलीप कांबळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा लातूरचा असून काम नसल्याने तो वाशी आणि सानपाडा पुलाखाली राहायचा. त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यावरून त्यास अटक करून वाशी कोर्टात हजर काण्यात आले. कोर्टाने 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.