Mumbai: महिलेने घेतले कर्ज, फेडता येत नसल्याने रिकव्हरी एजंटने केले अश्लील फोटो व्हायरल
Crime | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबईतील (Mumbai) एका महिलेने लोन अॅपद्वारे (Loan App) कर्ज घेतले. ते कर्ज फेडण्यास ती असमर्थ होती. कर्ज वसुली एजंटने संबंधित महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले. महिलेने क्रेडिट लोन नावाच्या अॅपद्वारे कर्ज घेतले होते. कर्ज फेडता न आल्याने तिला अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला. व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, जर तिने कर्जाची परतफेड केली नाही तर लवकरचb तिचा चेहरा त्या अश्लील व्हिडिओमध्ये मॉर्फ केला जाईल आणि तो तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या लोकांमध्ये प्रसारित केला जाईल. यानंतर संबंधित महिलेचे फोटो व्हायरल झाले. या घटनेबाबत सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 504, 507 अंतर्गत अपमान आणि धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, आयटी कायद्याच्या 67-ए (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रसारित करणे) अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंग्लिश न्यूज वेबसाईट इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 22 वर्षीय महिलेने पोलिसांना सांगितले की ती गृहिणी आहे. तिचा नवरा कॅब ड्रायव्हर आहे. काही महत्त्वाच्या कामासाठी त्याला पैशांची गरज होती. दरम्यान, एका यूट्यूब व्हिडिओमध्ये त्याला क्रेडिट लोन नावाच्या लोन अॅपची जाहिरात दिसली. तिने त्याच्या ई-मेल आयडीने साइन इन केले आणि सेल्फी फोटो पाठवला. यासोबतच आधार कार्ड आणि पॅनकार्डचा फोटोही पाठवला. (हे देखील वाचा: Shocking! काळी जादू केल्याच्या संशयावरून मुलांनी केली आपल्या आईची हत्या; पोलिसांकडून अटक)

संबंधित महिलेने 5000 रुपयांच्या कर्जाची गरज असल्याचे सांगितले होते, मात्र केवळ 3000 रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. महिलेने 2 जून रोजी हे कर्ज घेतले होते. जेव्हा ती परतफेड करू शकली नाही तेव्हा कर्ज वसुली एजंटने तिचा मॉर्फ केलेला नग्न फोटो तिच्या संपर्क यादीतील लोकांना पाठवला. तसेच त्याला 14 वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अनेक अश्लील संदेश पाठवले. महिलेला मिळालेल्या मेसेजमध्ये न्यूड फोटो होते. त्यावर संबंधित महिलेचा चेहरा मॉर्फ करून नंतर तो वाटण्यात आला. यानंतर संबंधित महिलेने पोलिसांशी संपर्क करणे चांगले मानले.