(प्रतिकात्मक फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकाच्या (Charni Road Station) प्लॅटफॉर्म 2 आणि 3 च्या उत्तर टोकावरील जुना फूट ओव्हर ब्रिज (FOB) बांधकाम कामामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत 45 दिवसांसाठी बंद राहील, असे पश्चिम रेल्वेने (Western Railway) म्हटले आहे. नव्याने बांधण्यात आलेला फूट ओव्हर ब्रिज आणि प्लॅटफॉर्म 2 आणि 3 यांना जोडणारा लिंकवे बांधण्यासाठी FOB बंद करण्यात येणार आहे. सध्याचे FOB चे दोन्ही स्पॅन पाडले जातील, असे पश्चिम रेल्वेने सांगितले. पश्चिम मार्गावरील उपनगरीय रेल्वे मार्गावरील चर्नी रोड हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. हेही वाचा Mumbai: ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी, पहा व्हिडिओ

दरम्यान, चर्नी रोड स्थानकाचे नूतनीकरण आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी रेल्वेने नूतनीकरणाचे काम प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये रेल्वे बुकिंग ऑफिस, बुकिंग स्टोअर, स्टेशन मास्टर्स ऑफिस, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक कार्यालय आणि तिकीट खिडक्या पुनर्संचयित करण्याचे काम समाविष्ट आहे.