लातुर: महाराष्ट्रातील एका गावातील मंदिरात दलितांच्या प्रवेशानंतर येथे मोठा गदारोळ निर्माण झाला. ही घटना लातूर जिल्ह्यातील असुन काही ग्रामस्थांनी मिळून स्थानिक दलित समाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. शनिवारी पोलिसांनी सांगितले की, बैठकीनंतर वाद मिटला असून आता परिस्थिती सामान्य आहे. दोन दलित तरुणांनी येथील हनुमान मंदिरात प्रवेश केल्याने हा वाद निर्माण झाला, असा दावा काही सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील ताडमुगली गावातील मंदिरात गेल्यानंतर या लोकांनी तेथे नारळही फोडला. यानंतर इतर काही तरुणांनी त्याच्या मंदिरात प्रवेश करण्यास हरकत घेतली. यानंतर इतर समाजाच्या लोकांनी गावातील दलित समाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
आम्ही दळण दिलं, किराणा दिलं की 50 हजार रुपये दंड लागणार असल्याचं काही दुकानदारांनी दलित महिलांना सांगितलं. तुमच्या 10 रुपयांसाठी एवढा दंड कशाला भरायचा? असा प्रश्नही त्यांनी महिलांना केला. आम्हाला गरिबांना कशाला ताप देताय... दिला की एवढ्या वेळेस, एकानं केलं अन् सगळ्यांना त्याचा त्रास कशाला? अशी आर्जव महिला दुकानदारांकडे करत होत्या. त्यावर गरिबानं नीट रहावं की... कशाला गावच्या मंदिरात जावं, असं म्हणत गिरणीवाल्याने दळण देण्यास नकार दिला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (हे ही वाचा Maharashtra SSC, HSC Board Exams 2022 Question Banks: यंदा 10वी,12वी च्या विद्यार्थ्यांसाठी maa.ac.in वर Question Banks जारी)
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला
याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक दिनेशकुमार कोल्हे यांनी सांगितले की, पोलिसांनी दोन्ही पक्षांची बैठक घेतली, त्यानंतर वाद मिटला. दोन तरुण समाजातील गैरसमजातून निर्माण झालेला वाद संपुष्टात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही बैठक आयोजित केली होती. त्यानंतर हा वाद मिटला.