Mumbai: वडिलांसोबत गर्दीच्या लोकल ट्रेन (Local Train) च्या डब्यात प्रवास करणाऱ्या 17 वर्षीय मुलीने 20 एप्रिल रोजी एका सहप्रवाशाने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर वांद्रे जीआरपीने गोरेगाव येथून एका सुताराला (Carpenter) पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) अटक केली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अंधेरी येथे उतरू इच्छिणारी किशोरी आणि तिचे वडील मरीन लाइन्स येथे विरारला जाणाऱ्या ट्रेनच्या जनरल डब्यात चढले. ट्रेन 6.25 वाजता वांद्रेला पोहोचली, त्यानंतर आरोपींसह जमाव आत शिरला. (हेही वाचा -Man Kills Father For Wife: आईला मारहाण केल्याप्रकरणी अंबरनाथमध्ये 19 वर्षीय मुलाने केली वडिलांची हत्या; आरोपी मुलाला अटक)
दरम्यान, आरोपीने दावा केला आहे की, त्याने मुलीला चुकून स्पर्श केला. भुताराम जहांगीर असं या आरोपीचं नाव आहे. प्रवासादरम्यान, पीडितेने तिच्या वडिलांकडे तक्रार केली की, आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तक्रारीनंतर, मुलीच्या वडिलांनी इतर प्रवाशांसह जहांगीरला पकडले. तथापी, आरोपीने दावा केला की, त्याने मुलीला चुकून स्पर्श केला.
अंधेरी येथे गाडी थांबल्यावर प्रवाशांनी आरोपीला जीआरपीच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्याला अटक करून 21 एप्रिल रोजी रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आलं. या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.