Man Kills Father For Wife: आईला मारहाण केल्याप्रकरणी अंबरनाथमध्ये 19 वर्षीय मुलाने केली वडिलांची हत्या; आरोपी मुलाला अटक

आरोपीने वडिलांना आईला मारहाण करू नका, असे कित्येकदा सांगितले होते. रविवारी दुपारी राजेश वर्माने पुन्हा पत्नीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने एक धारदार चाकू उचलला आणि त्याच्या वडिलांवर अनेक वेळा वार केले.

Man Kills Father For Wife: आईला मारहाण केल्याप्रकरणी अंबरनाथमध्ये 19 वर्षीय मुलाने केली वडिलांची हत्या; आरोपी मुलाला अटक
Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Man Kills Father For Wife: ठाणे जिल्ह्यात वडिलांची हत्या (Murder) केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी एका 19 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) केली. रविवारी अंबरनाथ परिसरात ही घटना घडली. उल्हासनगर पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी प्रकाश, त्याचे 52 वर्षीय वडील राजेश वर्मा यांच्यावर नाराज होता. कारण, आरोपीचे वडिल वारंवार आईला शिवीगाळ आणि मारहाण करत असे.

आरोपीने वडिलांना आईला मारहाण करू नका, असे कित्येकदा सांगितले होते. रविवारी दुपारी राजेश वर्माने पुन्हा पत्नीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने एक धारदार चाकू उचलला आणि त्याच्या वडिलांवर अनेक वेळा वार केले. (हेही वाचा - Mumbai: माहीम समुद्रकिनारी पोहताना दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश)

कुटुंबातील इतर सदस्यांनी जखमी व्यक्तीला स्थानिक रुग्णालयात नेले. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).