ठाणे (Thane) येथे रस्ता खचल्याने तीन वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अग्निशमन दलाने नुकसान झालेल्या बाहेर काढल्या. मात्र कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कामघर रुग्णाजवळील एका सोसायटीच्या जवळ असणारा रस्ता अचानक खचला. त्यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन कार आणि एका रिक्षाचे नुकसान झाले आहे. परंतु रस्ता कोणत्या कारणामुळे खचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(मुंबई: मालाड येथे रस्त्यावरील झाड अंगावर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू)
तर पोलिसांकडून घडलेल्या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. तसेच ऐन पावसाळ्याच्या वेळी रस्ता अचानक खचल्याने नागरिकांमध्ये अशा घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.