
मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad) येथे रस्त्यावरील झाड अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच अजून एक जण जखमी झाला आहे. त्यामुळे पावसाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न महापालिकेला विचारला जात आहे.
एस व्ही रोडवरील नारियलवाला कॉलनीजवळ आज सकाळी ही घटना घडली आहे. तर शैलेश राठोड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सकाळी शैलेश या ठिकाणहून जात असताना त्यांच्या अंगावर रस्त्यावर असलेल्या झाडाची फांदी तुटून पडली. यामध्ये शैलेश यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर मुंबईतील विविध ठिकाणी झाडे, होर्डिंग्स पडल्याच्या घटना गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहेत. या प्रकारामुळे नागरिकांचा बळी जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या काळात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.