Thane News: ठाण्यातील (Thane) आंनद निलकांतन यांना धमकावून त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भिंवडी अंतर्गत नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद निलकांतन हे देशातील प्रसिध्द लेखक आहे. देशात त्यांच्या पुस्तकांचे वाचक भरपूर आहे. आनंद नीलकांतन हे ठाण्यातील रहिवासी आहे. त्यांनी आज पर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केले. पौराणिक साहित्याचे लेखक म्हणून त्यांना देशभरात ओळखले जाते. सोबत ते स्तंभ लेखन ही करतात. "वाल्मिकी वुमन – फाइव्ह टेल्स फ्रॉम रामायण" नावाचे इंग्रजीत त्यांचे पुस्तक आहे.
नारपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ म्हणाले, "काही दिवसांपूर्वी आनंद नीलकांतन यांच्याशी रवींद्र चौधरी नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला होता. त्या व्यक्तीने आनंदला सांगितले की, त्याने "वाल्मिकींच्या महिला-रामायणातील पाच कथा' या पुस्तकाद्वारे एका समाजाचा अपमान केला आहे. आनंद यांना त्या व्यक्तीने सांगितले.
त्या व्यक्तीने त्यांच्या कडून १० लाख रुपयांची खंडणी केली. आंनद यांनी नारपोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. अशी माहिती मिळाली आहे.