Siddhivinayak Temple Maghi Utsav Schedule: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात साजरा होणार माघी गणेश उत्सव; प्रशासनाने जाहीर केले वेळापत्रक
या दिवशी राज्यातील गणपती मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चना होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही (Mumbai Siddhivinayak Temple) मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा होणार आहे. सिद्धिविनायक मंदिराने 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान मंदिरात होणाऱ्या वार्षिक माघी उत्सवासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
माघ शुद्ध चतुर्थीला (माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चौथा दिवस) माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) किंवा माघी गणपती उत्सव साजरा केला जातो. हा दिवस भगवान गणपतीच्या प्रकटदिन म्हणून ओळखला जातो. यंदा 2025 मध्ये, हा उत्सव 1 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. तिथी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 1.08 वाजता सुरू होते आणि 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.14 वाजता समाप्त होते. गणेशोत्सव 10 दिवस चालतो, तर माघी गणपती प्रामुख्याने एक दिवस विशेष पूजा आणि उत्सवाच्या रूपात साजरा होतो. मुख्यतः महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो.
या दिवशी राज्यातील गणपती मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चना होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही (Mumbai Siddhivinayak Temple) मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा होणार आहे. सिद्धिविनायक मंदिराने 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान मंदिरात होणाऱ्या वार्षिक माघी उत्सवासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
असा आहे कार्यक्रम-
महोत्सवादरम्यान नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 30 जानेवारी रोजी गायक शंकर महादेवन आणि तालवादक शिवमणी यांचे परफॉर्मन्स होणार आहेत.
1 फेब्रुवारीला गणेश जन्मदिवशी सिद्धेश मणेरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी एस के बोले मार्ग, गोखले रोड (दक्षिण), पोर्तुगीज चर्च, जाखादेवी चौक, सयानी रोड, खेड गल्ली, शंकर घाणेकर रोड आणि अण्णासाहेब मराठे रोड, या मार्गावर शोभा यात्रा
पोर्तुगीज चर्चजवळील शंकर मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, जाकादेवी मंदिर, हनुमान मंदिर, प्रभादेवी मंदिर यासह परिसरातील महत्त्वाच्या मंदिरांमधून ही मिरवणूक जाणार आहे.
सिद्धिविनायक मंदिरातील उत्सवाची सांगता 4 फेब्रुवारी रोजी पूर्णाहुतीच्या हवनाने होईल जो एक धार्मिक विधी आहे. (हेही वाचा: Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंतीनिमित्त पाठवता येतील अशा आकर्षक आमंत्रणपत्रिका, येथे पाहा)
भाविकांना सुचना-
मंदिर परिसरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. भाविकांना कागदी पिशव्यांमध्ये नैवेद्य घेऊन जाणे बंधनकारक करणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. कागदी पाऊच वाटपाची सुविधा लवकरच आयोजित केली जाईल.
पूजेची पद्धत-
गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून विधीवत पूजा केली जाते.
मोदक, दुर्वा आणि लाल फुलांनी गणपतीची आराधना केली जाते.
सकाळी आणि संध्याकाळी आरती, भजन व मंत्रजप केला जातो.
गणेश अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्रांचे पठण केले जाते.
दरम्यान, हा उत्सव विशेषतः कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. माघी गणपती उत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम आहे. या दिवशी गणपतीची पूजा करून संकटमुक्त आणि आनंदमय जीवनासाठी प्रार्थना केली जाते.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

