Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Whatsapp Status द्वारे त्यांच्या स्मृतीस करा नमन

मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांसारख्या नेत्यांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांचा स्वीकार केला. युनेस्कोने गांधी विचारांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली. अशाप्रकारे गांधीजींचे कार्य स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा आणि जागतिक शांततेसाठी प्रेरणादायी आहे.

Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Whatsapp Status द्वारे त्यांच्या स्मृतीस करा नमन
Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images

Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images in Marathi; शांततेचे प्रतीक, अहिंसा आणि सत्याच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी (Mahatma Gandhi Death Anniversary 2025). 30 जानेवारी 1948 दिवस भारतीय इतिहासातील काळा दिवस मानला जातो, कारण याच दिवशी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली. बिरला भवन, नवी दिल्ली येथे संध्याकाळी प्रार्थनेसाठी जात असताना, नथुराम गोडसेने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या पुण्यतिथीचा हा दिवस हुतात्मा दिन (शहीद दिवस) म्हणून पाळला जातो. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरातमध्ये झाला. त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवले. त्यांचे विचार आजही संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत.

बापूंची पुण्यतिथी म्हणजेच 30 जानेवारी हा शहीद दिन म्हणून पाळून, देश महात्मा गांधींना आदरांजली वाहतो. यावेळी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री राजधानी दिल्लीतील राजघाटावर असलेल्या गांधीजींच्या समाधीवर, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतो. यावेळी देशाच्या सशस्त्र दलातील हुतात्म्यांना अभिवादन केले जाते, तसेच बापू आणि शहीदांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात येते.

या दिवसाचे औचित्य साधत काही Messages, Whatsapp Status, Images शेअर करत महात्मा गांधींच्या स्मृतीस अभिवादन करा.

Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images
Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images
Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images
Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images
Mahatma Gandhi Death Anniversary 2025 HD Images

दरम्यान, महात्मा गांधींनी कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर ते इंग्रजांविरुद्धच्या चळवळीत सामील झाले. त्यांनी 1919 मध्ये रौलेट कायद्याला विरोध सुरू केला. या कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीला खटल्याशिवाय तुरुंगात पाठवण्याची तरतूद होती. महात्मा गांधींनी सत्याग्रहाची घोषणा करून संपूर्ण देश एकत्र करून आंदोलन केले. गांधीजींनी असहकार आंदोलन, दांडी पदयात्रा, भारत छोडो आंदोलन आणि सविनय कायदेभंग चळवळ केली. महात्मा गांधींच्या आंदोलनापुढे इंग्रजांना नमते घ्यावेच लागले. (हेही वाचा: Mahatma Gandhi Punyatithi 2025 Quotes: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त Images, WhatsApp Status, Messages द्वारे त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून करा त्यांना अभिवादन)

मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांसारख्या नेत्यांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांचा स्वीकार केला. युनेस्कोने गांधी विचारांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली. अशाप्रकारे गांधीजींचे कार्य स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा आणि जागतिक शांततेसाठी प्रेरणादायी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).